67 वर्षाच्या दाऊदची 27 वर्षाची गर्लफ्रेंड, का होतेय ट्रोल ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊदच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव समोर आले आहे. असे म्हटले जात आहे की, ती एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे जिला लोक ‘गँगस्टर डॉल’ म्हणून देखील ओळखतात. महविश हयात असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, महविश हयात ही पहिली पाकिस्तानी अभिनेत्री नाही जिचे नाव दाऊद इब्राहिमच्या नावाशी जोडले आहे. असे सांगितले जात आहे की, महविश दाऊदपेक्षा जवळपास 27 वर्षांनी लहान आहे. दाऊदने पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरीच गुंतवणूक केली आणि तिथे त्याचा मोठा प्रभाव आहे. कराची आणि लाहोरमध्ये त्याचे अनेक मोठे निर्माता आणि दिग्दर्शकांसोबत चांगले संबंध आहेत.

दाऊदचे नाव जोडल्यानंतर सोशल मीडियावर महविश हयातला बरेच ट्रोल केले जात आहे. मात्र, महविश हयातने सांगितले आहे की, तिच्याविरूद्ध कट रचला जात आहे. तिचा कोणाशीही संबंध नाही. अलीकडेच महविश हयातला पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान तमगा-ए-इम्तियाज प्रदान करण्यात आला होता.

महविश हयातच्या आधी दाऊदचे नाव अनिता अयूब या अभिनेत्रीशी देखील जोडले गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार, दाऊद आणि अनिताच्या प्रेमाविषयी लोकांना तेव्हा माहित झाले. जेव्हा निर्माता जावेद सिद्दीकीची निर्घृण हत्या केली गेली. या हत्येमागील कारण म्हणजे जावेदने अनिताला चित्रपटात साइन करण्यास दिलेला नकार. आयटम नंबरने आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या महविशने बॉलिवूडवर साहित्यिक चोरी करण्याचा आरोप केला आहे. आलिया भट्टचे पंजाबी व्हिडिओ सॉन्ग ‘पर्दा’ हे पाकिस्तानी सॉन्ग ‘गोरे रंग का जमाना’ सारखेच होते त्यामुळे तिने बॉलिवूडवर चोरीचा आरोप केला होता.