खळबळजनक ! तलावात सापडला शीर नसलेला मृतदेह

वसई : पोलीसनामा ऑनलाईन – वसईतील माजीलपाडा येथे शीर नसलेला आणि नग्नावस्थेतील महिलेचा मृतदेह साडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी एका नागरिकाला मृतदेह पाण्यात दिसल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस मृतदेहाचं शीर शोधत आहेत. मृत महिलेचे वय २० वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वसईतील माजीलपाडा येथे तलावात शीर नसलेला नग्नावस्थेतील मृतदेह रस्त्यावरून जाणाऱ्या एकाला दिसला. त्याने वाळीव पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तलावातून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. महिलेचे वय अंदाजे २० वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही तासांपुर्वीच मृतदेह तलावात फेकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस गायब असलेलं शीर शोधत आहेत.

मागील काही दिवसांपुर्वीच वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गा लगत गोणीत महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर आता तलावात मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.