Coronavirus : ‘कोरोना’मुळं भारतात आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू, 2301 रूग्ण संक्रमित : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली: वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच वृत्तसंस्था पी. टी. आय ने दिलेल्या वृत्तानुसार भारतात मृतांची संख्या ५० वरून वाढून ५६ झाली आहे तर एकूण २,30१ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान गुरुवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार मृतांची संख्या ५० होती. कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने आतापर्यंत (गुरुवारी) एका दिवसात सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली. 328 रुग्णांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी (2 एप्रिल) नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 1,649 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 151 लोक व्हायरसच्या संसर्गामुळे बरे झाले आहेत अशी माहिती गुरुवारी देण्यात आली.

तबलीगी जमातमधील 9000 लोक क्‍वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले

गृह मंत्रालयाचे सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितले की , गृह मंत्रालयाने 9000 तबलीघी जमात कार्यकर्ते आणि त्यांचे संपर्क ओळखले आणि त्यांना अलग ठेवण्यात आले. या 9000 लोकांपैकी 1306 विदेशी आणि बाकीचे भारतीय आहेत.