अरविंद केजरीवाल हे ‘दहशतवादी’ आणि ‘नलक्षलवादी’, भाजप नेत्याचे ‘वादग्रस्त’ विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख पक्ष प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजकीय पक्षातील स्टार प्रचारकांमध्ये शाब्दीक युद्ध रंगताना पहायला मिळत आहे. शाहीन बागची तुलना पाकिस्तानशी केल्यानंतर भाजप खासदार प्रेवश शर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवादी आणि नलक्षवाद्यांशी केली आहे. नक्षलवादी आणि दहशतवादी ज्या प्रमाणं सरकारी मालमत्तेचे नुकसान करतात, तसेच काम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत, असे वादग्रस्त विधान वर्मा यांनी केले आहे.

शाहीन बाग आंदोलनानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार प्रवेश शर्मा यांनी लक्ष केले आहे. दहशतवादी आणि नक्षलवादी ज्या प्रमाणे देशाचे नुकसान करतात. रस्त्यांची नासधूस करतात. सरकारी मालमत्तेचे नुकसान करता. तेच काम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रवेश वर्मा यांनी दिली.

दिल्ली विधानसभेची निवडणूकीच्या केंद्रस्थानी शाहीन बाग आंदोलन आहे. केजरीवाल यांनी शाहीन बागमधील आंदोलन संपवावं असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता वर्मा यांनी शाहीन बागची तुलना काश्मीरशी केली होती. जर आमचा पक्ष सत्तेत आला तर शाहीन बाग एका तासात रिकामा करून असे वर्मा म्हणाले होते.

शाहीन बागमध्ये कोण आंदोलन करत आहे आणि त्यांना कोणाचा पाठिंबा आहे हे सर्वांना ठावूक आहे. सत्ता आली तर एक तासात शाहीन बाग रिकामा करु असे विधान वर्मा यांनी केले होते. दरम्यान शाही बागमधील आंदोलनाबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर प्रवेश शर्मा यांना फोनवरून धमकी मिळाली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like