दिल्लीतील लाजिरवाण्या पराभवानंतर मनोज तिवारींनी दर्शविली राजीनाम्याची तयारी, भाजप पक्ष श्रेष्ठींनी दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर भाजप हायकमांडने त्याना पदावर कायम राहण्यास सांगितले आहे. तिवारी यांनी दिल्लीमध्ये 48 जागा जिकण्याचा दावा केला होता. परंतु भाजपला केवळ आठ जागेवरच समाधान मानावे लागले.

शेवटपर्यंत विजयाची होती आशा
मनोज तिवारी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. निवडणुकीवेळी तिवारी हे सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत होते. निकालाच्या दिवशी दुपारपर्यंत त्यांना आशा होती की भाजपला बहुमत मिळेल. मात्र जसा जसा दिवस संपत गेला तशी तशी त्यांची आशा देखील संपत गेली. नंतर त्यांनी हार मान्य केली आणि अखेर केजरीवालांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

ट्विटमध्ये 48 जागा जिंकण्याचा केला होता दावा
निकालाआधी आलेले एक्सिट पोल पूर्णपणे आम आदमी पक्षसोबत होते परंतु मनोज तिवारी अडून बसले होते की, भाजपला 48 जागा मिळणार. त्यांनी ट्विट देखील केले होते की, हे एक्सिट पोल देखील फेल होणार आहेत. माझे हे ट्विट सांभाळून ठेवा भाजप 48 जागी विजय मिळवणार असल्याचे देखील तिवारी ट्विटमध्ये म्हंटले होते.

पराभवानंतर ट्विटबाबत दिले स्पष्टीकरण
यावर मनोज तिवारी म्हणाले की, प्रदेश अध्यक्ष आहे आणि आमचा अंतर्गत सर्वे देखील असतो आणि आम्ही सुरुवातीलाच हरणार आहोत असे म्हणू शकत नाही आणि कोणी असे बोलत देखील नाही. ज्यांना केवळ 4 टक्के मतदान झाले त्यांनी देखील कधी असे म्हणता काम नहे आणि त्यांनी देखील ही लढाई लढली पाहिजे असे म्हणत तिवारी यांनी माझा अंदाज चुकला असे स्पष्टीकरण दिले.

ट्विटला सांभाळून ठेवा
मनोज तिवारी म्हणाले, मी जो 48 ठिकाणच्या विजयाची यापेक्षा करत होतो त्या ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती चांगली नाही. शाळांची चांगली अवस्था नाही या आधारावर आम्ही विचार केला होता की येथील जनता आम्हाला निवडून देईल. तुम्ही माझे ट्विट सांभाळून ठेवले असेल तर आता ते जपून ठेवा असे देखील तिवारी म्हणाले.