JNU Student Protest : ‘बॅरिकेट’स् तोडून संसदेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखलं, कलम 144 लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थ्यांचे फी वाढीविरोधात आंदोलन उग्र होताना दिसत आहे. जेएनयूमध्ये जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये पोलिसांनी लावलेले बॅरिकेट तोडून संसद भवनकडे जाण्यास सुरुवात केली. यावर पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांना रोखले आहे. विद्यार्थ्यांचा हा मोर्चा पाहताच पोलिसांनी 144 लागू केले आहेत.

दरम्यान, ही समस्या सोडवण्यासाठी मानव संसाधन मंत्रालयाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे, जे जेएनयूचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी तोडगा काढण्याची शिफारस करेल. जेएनयूसाठी स्थापन केलेली ही समिती विद्यार्थी व प्रशासनाशी संवाद साधेल आणि सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिफारशी देईल.

पोलिसांनी सांगितले- संसदेत जाऊ देणार नाही –

जेएनयू विद्यार्थ्यांच्या संसदेच्या मोर्चावर दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की विद्यार्थ्यांना संसदेत जाऊ दिले जाणार नाही. कलम 144 संसदेच्या परिसराच्या आसपास लागू आहे. विद्यापीठ परिसरातील एक किलोमीटरच्या आत जेएनयूच्या विद्यार्थ्यांना रोखण्याची योजना आहे.

लोक कार्यालयात पोहोचू शकले नाहीत-

कार्यालयात जाणाऱ्या लोकांना या आंदोलनाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. अरुणा आसिफ अली रोडवर पोलिस बंदोबस्तामुळे बरेच लोक अडकले. येथे एका व्यक्तीने सांगितले की जेएनयूच्या विद्यर्थ्यांचे हे रोजचे काम बनले आहेत. हे कितपत योग्य आहे. यात आम्हाला का सतावले जात आहे. पोलिसांनी आधी बॅरिकेडिंग करून मार्ग फिरविला पाहिजे होता.

रुग्णवाहिकाही अडकली –

त्याचवेळी मुझफ्फरनगरहून रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही आसिफ अली रोडवरील जाममध्ये अडकली. रुग्णवाहिकेतून गंभीर रूग्णांना स्पाइनल रुग्णालयात नेण्यात येत होते. नंतर, स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिस बॅरिकेटस् हटविण्यात आली आणि रुग्णवाहिकेला जाण्यासाठी एक मार्ग देण्यात आला, परंतु या कामास सुमारे 30 मिनिटे लागली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like