USA-चीन सह 20 देशांमधील 83 तगलिगी जमातींच्या विरोधात आज चार्जशीट दाखल करणार दिल्ली पोलिस

दिल्ली :  वृत्तसंस्था –  निजामुद्दीन मरकज प्रकरणात दिल्ली पोलीस मंगळवारी आरोपपत्र दाखल करणार आहेत. साकेत कोर्टात दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा २० देशांतील ८३ तबलीगी जमातमधील सदस्यांविरूद्ध आरोपपत्र सादर करेल. आरोपपत्रात मरकज ट्रस्ट मॅनेजमेंटचेही नाव समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे. सर्व पुरावे गोळा केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र तयार केले आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल परदेशी सदस्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निजामुद्दीनमधील मरकजमध्ये तबलिगी जमातीबाबत मार्च महिन्यात खूप गोंधळ उडाला होता. बंदीनंतरही देश-विदेशातील ५ हजाराहून अधिक लोक येथे जमले होते, असे सांगितले जात आहे. कोरोनाचे संक्रमण शेकडो जमात सदस्यांमध्ये पसरले. इतकेच नव्हे तर जमातचे बरेच सदस्य माहितीशिवाय देशाच्या विविध भागात गेले, जिथे त्यांच्याकडून इतर लोकांमध्ये संसर्ग पसरला. तपासणी दरम्यान दिल्ली पोलिसांना असे आढळले होते की, बरेच परदेशी सदस्यही व्हिसा नियमांचे उल्लंघन करत मरकजमध्ये लपले होते.

या देशातील सदस्यांवर खटला

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या २० देशातील जमातींविरूद्ध हे आरोपपत्र दाखल केले जात आहे, त्यात सौदी अरेबियाचे १०, चीनचे ७, यूएसएचे ५, ब्रिटनचे ३, सुदानचे ३, फिलिपिन्सचे ६, ब्राझीलचे ८, अफगाणिस्तानचे ४ असे एकूण ८३ सदस्य आहेत.

एसआय संक्रमित

दिल्लीतील मरकज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या पोलिस एसआयमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला आहे. कोरोना वॉरियर्स म्हणून फ्रंट लाइन मध्ये असलेल्या दिल्ली पोलिसांच्या या जवानाला मरकज प्रकरणात चौकशी पथकात ठेवले गेले होते. सांगितले जात आहे की, दिल्ली पोलिस गुन्हे शाखा चाणक्यपुरीच्या एका उपनिरीक्षकाला कोविड-१९ संसर्गाची पुष्टी झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल गेल्या शनिवारी रात्री उशिरा आला, ज्यामध्ये ते पॉजिटीव्ह आढळले.