आमदार तानाजी सावंतांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या मराठवाड्यातील बैठकीला तानाजी सावंत यांच्या अनुपस्थितीमुळे ही नाराजी असल्याचं समजत आहे. तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे. यासाठी दुपारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसैनिकांची मागणी आहे की, तानाजी सावंत यांच्यावर पक्षाविरोधातील कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करावी. त्यांच्या वागण्यामुळे शिवसेनेची प्रथा-परंपरा आणि नियमांचं उल्लंघन झालं आहे असं शिवसैनिक सांगतात. आज दुपारी मातोश्रीवर याच संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

नाराज तानाजी सावंतांविरोधात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्या दरम्यानदेखील तानाजी सावंत कुठेच दिसले नव्हते. मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांचं नाव नव्हतं तेव्हा त्यांचे उद्धव ठाकरेंसोबत खटके उडाले होते. यानंतर त्यांची नाराजी वाढताना दिसून आली. त्यांचं कृत्य वारंवार त्यांची नाराजी सांगत होतं. ते पक्षाविरोधात जात आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवैसनिकांनी केली आहे. उद्धव ठाकरे आता कठोर भूमिका घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/