हाजी गफूर पठाण यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हेंटिलेटर प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या स्वनिधीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महापालिकेचे नायडु हॉस्पिटल आणि कोंढव्यातील नॅशनल हॉस्पिटल यांना दोन पोर्टेबल व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले.

कोरोना प्रादुभार्वामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवत होती. विशेषत: व्हेंटिलेटर्सची आवश्यकता अनेक रुग्णांना भासत आहे. या जाणिवेतून नगरसेवक अ‍ॅड. हाजी गफूर पठाण यांनी दोन व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला.

ajit pawar

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, हाजी गफूर पठाण हे नेहमीच सार्वजनिक कामाला मदत करीत असतात. कोरोना रुग्णांना सध्या व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. पठाण यांनी दोन व्हेंटिलेटर दिले आहे. त्यातील एक महापालिकेच्या रुग्णालयात असल्याने त्याचा प्रश्ना नाही. या व्हेंटिलेटरचा चांगला वापर झाला पाहिजे. गोरगरीबांना त्याचा उपयोग होऊन द्या.

या कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल शेळके, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका नंदा लोणकर, शिल्पा भोसले, अल्पसंख्यांक अध्यक्ष अजिम गुडाकुवाला, मोहसीन शेख, उल्मा- ए – किराम मध्ये मौलाना आयुब अशरफी, मौलाना निजामुद्दीन,मौलाना मन्सूर, मौलाना हमीद जलीस, प्रोफेसर अजहर वारसी, सय्यद सर, प्रोफेसर रियाजुद्दीन सर, डॉ. शकील, कौसरबाग वेल्फेर फाउंडेशन चे अध्यक्ष आबीद सय्यद, इम्तियाज शेख, हानिफ शेख, जहिर शेख, सलीम शेख, इरफान मुलाणी आदि उपस्थित होते. गफूर पठाण यांनी आभार मानले.