अजितदादा मनसे नगरसेवकावर भडकले, म्हणाले – ‘लांबून बोला, आमचे 4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह’

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज (शुक्रवार) पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मनसे नगरसेवकावर चांगलेच भडकल्याचे पहायला मिळाले. मनसे नगरसेवक भेटण्यासाठी गेले असता, आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोलना जरा फिजिकल डिस्टन्स ठेवना असे म्हणत ते मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर चांगलेच भडकले.

यावर मनसे नगरसेवक सचिन चिखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एव्हडीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवायचा कशाला, ऐकून घ्यायचं नव्हत तर निमंत्रणच कशाला दिले, असा सवाल त्यांनी केला आहे. एढच नाही तर त्यांनी अजित पवार यांच्या वर्तवणुकीवरही नाराजी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षांच्या गट नेत्यांना आमंत्रित केलं होतं.

या दौऱ्यादरम्याने जम्बो सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी करण्यात आली. सेंटरची माहिती घेण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासनातील तब्बल 40 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना यावेळी बोलावण्यात आले होते. तर त्याहीपेक्षा जास्त संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाल्याने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

सचिन चिखले म्हणाले, आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी गेलो होतो. कोरोना बाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी सचिन चिखले हेही त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र अजित पवारांनी ऐकून घणं तर लांबच उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचे नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले की, अजित पवारांच्या नकळत हा प्रकार घडला. मास्क लावलेला असल्याने ते नेमके कोण आहेत हे त्यांच्या लक्षात आलं नसाव. सोशल डिस्टन्सिगबाबत त्यांनी दिलेल्या सूचना योग्य आहेत. मात्र याचा विपर्यास करुन गैरसमज करून घेऊ नये अशी विनंती संबंधित नगरसेवकास केली आहे. तसेच त्यांच्या मागण्या अजित पवारांना प्रत्यक्ष भेटून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.