सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याविषयी उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन : तेरदाळे-मुसळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागिल सहा महिन्यापासून सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्र बंद आहे. ती सुरू करण्यासाठी नियम व अटीसह परवानगी द्यावी. यासाठी मोडनिंब (ता. माढा, जि. सोलापूर) अखिल महाराष्ट्र लोकनाट्य व सांस्कृतिक थिएटर मालक संघटनेच्या वतीने अभयकुमार तेरदाळे-मुसळे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी केली. याप्रसंगी राजाभाऊ चौधरी, अभयकुमार तेरदाळे, श्रीनिवास अखनगिरे, राजुशेठ तांबे व शिवाजीराव परांडे उपस्थित होते. यावेळी अजितदादा पवार यांनी चर्चा करून थिएटर सुरू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे सांगितल्याचे अभयकुमार तेरदाळे-मुसळे यांनी सांगितले.

तेरंदळे-मुसळे म्हणाले की, कोरोनामुळे मागिल सहा महिन्यांपासून सांस्कृतिक कलाकेंद्र बंद आहेत. त्यामुळे सुमारे सात-आठ हजार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकेंद्रे सुरू झाली, तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.