Devendra Fadnavis | ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी केल्यास पोलिसांना थेट बडतर्फ करणार, देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करी (Drug Trafficking) तसेच विक्रीचे प्रमाण वाढत आहे. हा मुद्दा शुक्रवारी (दि.8) विधानपरिषदेत (Legislative Council) देखील उपस्थित करण्यात आला. राज्यातील ड्रग्जविरोधात पोलीस विभागाची (Maharashtra Police) लढाई सुरु आहे. मात्र, जर ड्रग्ज विक्री करणाऱ्या आरोपींसोबत कुणी हातमिळवणी केली अथवा त्यांचे संगनमत असेल तर कलम 311 अंतर्गत संबंधित पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फच (Dismissed) करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत केली.

अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. खोपोलीत 70 ते 80 किलो एमडी पावडर (MD) जप्त झाल्याची बाब त्यांनी मांडली. त्यावर बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांनी (Union Home Minister) देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती. यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल चर्चा झाली. तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अंमली पदार्थ तयार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळेच विशेषत: संभाजीनगर, रायगड, नाशिक, पुणे या भागांतील बंद कारखान्यांत हालचाल आढळून आल्यास तिथे छापे टाकण्याची कारवाई सुरु आहे. राज्यात पोलीस विभागामार्फत ड्रग्ज विरोधात लढाई सुरु असून ती बराच काळ चालेल. अनेकदा बाहेरील राज्यातील पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्यांना मिळालेल्या इंटेलिजन्सच्या आधारावर ती कारवाई केली जाते. परंतु, बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना दिली जाते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळवडे परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा महिलांचा होरपळून मृत्यू, 8 जण गंभीर

पुण्यात प्रियांक खर्गे यांच्याविरोधात आंदोलन, सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार