अजित पवार चालतात पण खडसे का नाही ? यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांना तिकीट न देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारचा होता असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

एकनाथ खडसे हे पक्षावर अनेक दिवसांपासून नाराज होते, तशी खदखद खडसेंनी अनेकदा बोलूनही दाखवली. मात्र गोपीनाथ गडावरील भाषणामध्ये एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले होते. तर मी पक्षाकडे फक्त एवढेच विचारत होतो की मी एवढे दिवस पक्ष सांभाळला तर माझे तिकीट का कापले ? असा सवाल खडसे यांनी गोपीनाथ गडावरून उपस्थित केला होता.

वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की, इतर पक्षातून आलेले लोक तुम्हाला चालतात, एवढेच नाही तर सत्ता स्थापनेसाठी अजित पवार देखील चालतात मग इतकी वर्षे भाजपात असलेले एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता हे का चालत नाहीत ? यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, आम्ही एकनाथ खडसे आणि इतर उमेदवारांच्या तिकीटाची शिफारस केंद्र नेतृत्वाकडे केली होती परंतु या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय हा केंद्र नेतृत्वाचा होता त्यात राज्यसरकारच्या हातात काहीच नव्हते आणि अखेर पक्षाने देखील खडसे यांच्या मुलीला तिकीट दिले असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी यावेळी दिले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/