Devendra Fadnavis On Ajit Pawar | अजित पवारांकडे खूप वेळ आणि मला खूप कामे…; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी असे दिले प्रत्युत्तर!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Ajit Pawar | अजित पवारांना खूप वेळ आहे, ते असे सतत आरोप करत राहतील. त्याची उत्तर द्यायला मला वेळ नाही, मला खूप कामे आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. (Devendra Fadnavis On Ajit Pawar)

 

राज्य सरकारमधील (State Government) अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही. जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) केली होती.

 

तसेच भय आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर भाजपा (BJP) लोकशाही विकत घेत आहे आणि विकण्याची प्रक्रिया राबवत आहे, अशी टीका काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. पटोलेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही काही बोलत असतात. (Devendra Fadnavis On Ajit Pawar)

 

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) अस्तित्वात आल्यापासून प्रस्ताव स्थगिती सुरू आहेत आणि 138 उद्योग एमआयडीसी मध्येच अडकले असल्याची टीका विरोधक करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, विरोधकांना कुठलीही माहिती नाही. कुठलीही माहिती न घेता ते बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही, अशा विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही.

फडणवीस म्हणाले, जिथे गडबड आहे अशी कुठलीही चौकशी बंद होणार नाही.
पण जिथे गडबड नाही पण जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या चौकशी केली असेल, तर अशा चौकशा केल्या जाणार नाहीत.
बदल्यांबाबत ते म्हणाले, योग्य वेळी बदल्या होतील. मागील वेळच्या बदल्या या सप्टेंबरमध्ये झाल्या आहेत.
जे बदलीपात्र आहेत त्यांच्या बदल्या या सप्टेंबरनंतर होतील.

 

नांदेड येथे पोलीस भरतीच्या मागणीसाठी तरुणांनी फडणवीसांसमोर घोषणाबाजी आणि धक्काबुक्की केली होती,
यावेळी सौम्य लाठीमार करावा लागला होता. परंतु, यावर फडणवीस म्हणाले, कुठेही धक्काबुक्की, लाठीचार्ज झालेला नाही.
पोलीस भरतीची मागणी ते करत होते. मी त्यांना जाऊन भेटलो आणि भरती करू, असे सांगितले. त्यानंतर मी तिथून निघालो.

 

Web Title :- Devendra Fadnavis On Ajit Pawar | BJP leader and deputy chief minister devendra fadnavis criticizes opposition leaders ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार

Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी

Dhananjay Munde | ‘अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात’, पक्षाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी (व्हिडिओ)