मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला. शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी रोप रुजवले आणि ते वाढवले ही. त्याच शिवाजी पार्क मैदानावर आज उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो.
त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! @OfficeofUT @uddhavthackeray— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असली तरी प्रमुख आकर्षण होते ते राज ठाकरे यांचे. राज ठाकरे आपल्या कुटुंबासह या सोहळ्यासाठी हजर होते. आजच्या या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे मित्र देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. मात्र, फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीच नाही. शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंना न भेटताच फडणवीस परतले. त्यानंतर त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे का रे दुरावा असा प्रश्न उपस्थितांच्या मनात आला असणार. देवेंद्र फडणवीस याचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न शिवसेनेमुळे पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस थोडेसे निराश असेल म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेता परतले.
शिवसेना आणि भाजपची युती टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका राहिली आहे. या दोन्ही नेत्यांनी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती जपण्याचा महत्वाचा रोल निभावला. मागील पाच वर्षात दोन्ही नेत्यांमध्ये असलेले मैत्रीचे संबंध अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने त्यांना आम्ही पाठिंबा दिला, दुसरा कोणी असता तर कदाचित आम्ही विचार केला असता असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, आजच्या शपथविधी सोहळ्यात भेट न घेतल्याने, या दोन मित्रांच्या दोस्तीत मुख्यमंत्रीपदावरुन कुस्ती झाल्याचे उघड झाले.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय