‘कमळाबाईच्या मुंबई अध्यक्षांचे तोंड म्हणजे फुटके खापर’ : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कमळाबाईच्या अध्यक्षाचे तोंड म्हणजे फुटके खापर आहे ! युज अ‍ॅन्ड थ्रो अशा या बोलघेवड्याचा फक्त वापर आहे ! असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीक केली आहे. ट्विट करत त्यांनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी मनसे आणि राष्ट्रवादीवर ट्विट करत टीका केली होती. त्याला आता मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये एक कविताच पोस्ट केली आहे. आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात की,

आशिष शेलार यांचे तोंड म्हणजे फुटके खापर आहे अशा बोचऱ्या शब्दात धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. आता या टीकेला आशिष शेलार काही उत्तर देणार का ? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार ?
दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना आशिष शेलार म्हणाले होते की, “रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले… स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे…धनंजयराव चिडले ? लेकीन अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं.. ? वो तो देखलो !..लढ धन्नो..!!” असे म्हणत शेलार यांनी मुंडेंवर बोचरी टीका केली होती.

Loading...
You might also like