सोशल मीडियापासून MS धोनी राहतोय अलिप्त, 6 महिन्यानंतर आभार मानण्यासाठी केलं ट्विट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सोशल मीडियाव्दारे सतत चर्चेत राहण्यासाठी अभिनेता, अभिनेत्री यांच्यासह क्रिकेटर्स देखील प्रयत्नशील असतात. मात्र, क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी मात्र या सोशल मीडियापासुन अलिप्त राहत असल्याचे आढळलं आहे. त्यानं सहा महिन्यानंतर व्टिट केल्याचं आढळलं आहे.

धोनीने 6 महिन्यानंतर ट्विटरवर पोस्ट केली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे आभार मानले आहेत.

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी नाराजी व्यक्ती केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धोनीला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच धोनीच्या खेळीतील आठवणीही जागविल्या आहेत.

क्रिकेटर, भारतीय सैन्य दलाचा अधिकारी यासह उत्तम माणूस आहे, अशा शब्दांत नरेंद्र यांनी धोनीचे कौतुक केलं आहे. पंतप्रधानांच्या या पत्रानंतर धोनीने आपल्या ट्विटरवरुन मोदींच्या पत्राबद्दल आभार मानलेत.

’धोनी तुझ्यात नव्या भारताचा आत्मा दिसतो. ’न्यू इंडिया’ मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबीयांची ओळख दाखवत नाही तर, युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होत असतात. धोनी तू, 15 ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला, आणि हा व्हिडीओ बरेच काही सांगून जातो. यात खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावे, हेही समजते.’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केलं आहे. धोनीने ट्विटरवरुन हे पत्र शेअर केलंय.

’कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना फक्त कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाची आणि बलिदानाची नोंद घेतली जावी, आणि त्यांचे सर्वांनी कौतुक करावे, असे त्यांना वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद,’असे म्हणत महेंद्रसिंग धोनीने पंतप्रधानांनी पाठवलेले पत्राचे ट्विटरवरुन आभार मानले आहेत.

धोनीने या अगोदर ट्विट 14 फेब्रुवारी रोजी केले होते. कान्हा येथील व्याघ्र दर्शनाचा फोटो धोनीने ट्विट केला होता. त्यात आपल्या इंस्टाग्रामची लिंक पेस्ट केली होती. त्यानंतर, धोनीने तब्बल 6 महिने आणि 8 दिवसांनंतर ट्विट केलंय, तेही पंतप्रधान मोदी यांचे आभार मानण्यासाठी.

महेंद्रसिंग धोनीचे ट्विटरवर 7.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तर, धोनी फक्त 34 जणांना फॉलो करतो. त्यामध्ये, सचिन तेंडुलकरसह इतर काही खेळाडूंचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्य दलाच्या अकाऊंलाही धोनी फॉलो करतोय. तसेच सलमान खान आणि आमीर खानला देखील धोनी फॉलो करतोय.