धुळे : कृषि महाविद्यालयात ‘रक्तदान’ शिबिर संपन्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय कृषी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रक्तपेढीतील डॉ. संदीप पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांचे हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असल्याचे दाखवून दिले.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर, प्राध्यापक डॉ. एस. पी. सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. खुशाल बराटे, एनसीसी अधिकारी डॉ. संदीप पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. जितेंद्र सूर्यवंशी, शारीरिक शिक्षण अधिकारी प्रा. पुष्पशील शेळके, रेक्टर डॉ. सी. वि. पुजारी, मॉनिटर डॉ. कंखरे, डॉ. रौंदळ, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, विभाग प्रमुख डॉ. धाडगे, डॉ. पांडुरंग शेंडगे, डॉ रंगनाथ दातखिळे, सहा. कुलसचिव विजय पाटील, डॉ सुनील पाटील डॉ रवींद्र पाटील, इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –