धुळे : निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – एस.टी. महामंडळाशी वारंवार पत्र व्यवहार करून तसेच अधिकाऱ्यांची भेट घेऊन देखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे प्रलंबीत मागण्यांसाठी एस.टी. सेवेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांनी आज (दि. 23 जानेवारी) रोजी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनविरोधी घोषणा दिल्या.

निवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या –

1) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोजंदारी काळातील फरकाची रक्कम न मिळण्याबाबत
2) सेवा निवृत्त कर्मचाऱ्याना व अधिकारी यांचे कामगार करारातील फरकाची रक्कम (शिल्लक हप्ते) एक रक्कमी न मिळाल्याबाबत
3) सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या फाईल इ.पी.ओ. (पेन्शन ऑफिस) नाशिक यांचेकडे पाठविण्यास होणारा दिर्घ विलंबाबात
4) बी.पी.डी.झेड. ची रक्कम एस.टी. प्रशासनाकडे पडून असून संबंधित कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर करून देखील त्यांना रक्कम अदा केली जात नसल्याने त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याबाबत.
या प्रलंबित मागण्यांसाठी निवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांकडून धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात धुळे, विभागातील सर्व एस.टी. कामगार संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते. हे आंदोलन धुळे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष वाय.जी.राजपूत, सचिव एस. डी. जाधव, पी.वाय.भट, एस. डी. पाटील यांनी प्रलंबित मागणीचे लेखी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिले. तसेच मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा –