लॉकडाऊनमध्ये विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

धुळे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  देशात लॉकडाऊन सुरू असताना विदेशी मद्याची वाहतूक करताना शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मारुती स्विफ्ट कार व विदेशी दारू असा एकूण 2 लाख 64 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती की, देशात लॉकडाऊनचा चौथा टप्प्याला सुरवात झाली आहे. शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी एक पोलीस पथक तयार करून साक्री रोड कुमार नगर जवळ नाकाबंदी लावून वाहन तपासणीस सुरवात केली. पोलीस कर्मचारी हे वाहन तपासणी करत असताना एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार समोरून येताना दिसली. पोलीसांनी गाडी अडवून तपासणी केली असता गाडी मागील सिट जवळ व डिक्कीत कागदी खोक्यात ईम्पेरीयल ब्लु विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. लॉकडाऊन परिस्थिती सुरु असताना गाडीतून अवैधरित्या वाहतूकी बाबत विचारणा केली असता त्यांनी योग्य ती माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली.

शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी आपले नाव योगेश शरद खोपडे (वय. 30 रा. गल्ली नं.4 विठ्ठल मंदिर जवळ, धुळे) व कुणाल विठ्ठल रायकर (वय.31.रा.पश्चिम हुडको पवन नगर धुळे) असे सांगतिले. दोघांकडून एक मारुती स्विफ्ट कार (एमएच 15 ईएक्स 1589) व विदेशी दारू असा एकूण 2 लाख 64 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना विरूद्ध हेड कॉन्स्टेबल मनिष सोनगीरे यांनी फिर्याद दिली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधिकारी डॉ. राजू भुजबळ, शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कॉन्स्टेबल व्हि. आर. भामरे, पि. डी. पाटील, एन. के. पोतद्दार यांनी केली आहे.