Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी वरदान ‘हे’ ५ फूड्स, ब्रेकफास्टमध्ये करा समावेश, दिवसभर वाढणार नाही ‘ब्लड शुगर’चा पारा

नवी दिल्ली : Diabetes | डायबिटीज रूग्णांसाठी नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. सकाळी हेल्दी फूड्स खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते. त्यांनी नाश्त्यात हाय फायबर, मीडियम प्रोटीन आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खावेत (Best Breakfast For Diabetes Patient).

डायबिटीज रुग्णांसाठी नाश्त्यात अंडी (Egg) हा उत्तम पर्याय आहे. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, अंडी खाणे पोषक असते. यामध्ये हाय प्रोटीन, मीडियम फॅट आणि कमी कार्ब असते. यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल राहते. (Diabetes)

हाय ब्लड शुगरचे रुग्ण सकाळच्या नाश्त्यात दलिया (Oatmeal) खाऊ शकतात. व्हेजिटेबल दलिया देखील खूप आरोग्यदायी मानले जाते. दलियामध्ये सोल्यूबल फायबर असते, जे ब्लड शुगर कंट्रोल करते यातील फायबरमुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यात कार्बोहायड्रेट असते, परंतु तरीही ते डायबिटीजसाठी फायदेशीर आहे.

चिया सीड पुडिंग (Chia Seed Pudding) एक हेल्दी ब्रेकफास्ट आहे. यामध्ये सोल्यूबर फायबर आणि कार्बचे प्रमाण कमी असल्याने ते डायबिटीज रूग्णांसाठी उत्तम स्नॅक आहे. चिया सीड्स रात्रभर भिजवून खाल्ल्यास ब्लड शुगर कंट्रोल राहते. (Diabetes)

सकाळी मल्टीग्रेन टोस्ट (Multigrain Toast) नट बटर (Nut Butter)
सोबत खाल्ल्यास दिवसभर ब्लड शुगर कंट्रोल राहते. नट बटरमधील हेल्दी फॅट्स रक्तप्रवाहात शुगरचा प्रवाह मंद करतात, ज्यामुळे ब्लड शुगर वाढत नाही.

डायबिटीज रुग्ण नाश्त्यात बेसन चिला (Besan Chilla) खाऊ शकतात.
त्यात मध्यम प्रोटीन आणि फायबर असते. यामुळे आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात आणि ब्लड शुगर वाढत नाही.
कार्बचे सेवन कमी करण्याचा उत्तम पर्याय असल्याने डायबिटीज कंट्रोल राहतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर