×
Homeआरोग्यDiabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी 'हे' 5 नियम आहेत आवश्यक,...

Diabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नियम आहेत आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control Tips | मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे जो खराब जीवनशैलीमुळे होतो, ज्यावर नियंत्रण न ठेवल्यास ब्लड शुगर (Blood Sugar) लेव्हल झपाट्याने वाढू लागते. अयोग्य आहार आणि तणावामुळे विकसित होणारा हा आजार नाहीसा करता येत नाही, फक्त त्यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाला मधुमेह मेलिटस (Diabetes Mellitus) असेही म्हणतात. (Diabetes Control Tips)

 

आहारावर नियंत्रण न ठेवल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक प्रकारचे धोके होऊ शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनी, डोळे, फुफ्फुस, हृदय आणि रक्तदाब वाढू शकतो. टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. भारतात टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण जास्त आहेत. (Diabetes Control Tips)

 

मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, कोरोनाच्या काळात या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या आजाराची लक्षणे वेळीच ओळखली तर या आजारावर बर्‍याच अंशी नियंत्रण मिळवता येते. या आजाराची लक्षणे कोणती आणि कोणते नियम पाळल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे ते जाणून घेवूयात…

 

मधुमेहाची लक्षणे :

वारंवार तहान लागणे
भूक लागणे
वजन वाढणे किंवा कमी होणे
थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
जखमा लवकर बर्‍या होत नाहीत
गळू किंवा त्वचेच्या समस्या
दृष्टी अंधुक होणे
हात आणि पाय सुन्न होणे
पाय आणि गुडघेदुखी

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणते नियम पाळावेत हे योगगुरू बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घेवूयात.

 

1. मादक पदार्थांचे सेवन थांबवा :
जर तुम्हाला मधुमेह असेल तर सर्वप्रथम तुम्ही सिगारेट, अल्कोहोल आणि ड्रग्जचे सेवन बंद केले पाहिजे. तंबाखू आणि मादक पदार्थांच्या सेवनाने साखरेची पातळी वाढते. साखर वाढल्याने कर्करोग, हृदय, फुफ्फुसात समस्या निर्माण होऊ शकतात.

 

2. वजन नियंत्रित करा :
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवायची असेल तर वजन नियंत्रित ठेवा. वाढते वजन हे अनेक आजारांचे मूळ आहे. वजन कमी (weight loss) करून तुम्ही मधुमेहाची तीव्रता कमी करू शकता.

 

3. नियमित व्यायाम करा :
मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम करा. शारीरिक हालचाली साखरेवर नियंत्रण ठेवतात. जर तुम्ही व्यायाम (Exercise) करत नसाल तर जेवल्यानंतर चालायलाच हवे, मधुमेहाचा धोका कमी होतो.

 

4. अशाप्रकारचे अन्न टाळा :
मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारात चरबीयुक्त, तेलकट, तळलेले, साखर, मीठ, मांस, हाय प्रोटीनयुक्त पदार्थ टाळा. शुगर कंट्रोल करण्यासाठी डॉक्टरांकडून डायट चार्ट बनवून त्याचे पालन करा.

 

5. या विशेष अन्नाचा करा आहारात समावेश :
मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारात हिरव्या भाज्या, फळे, धान्य, सोयाबीन, शेंगा, डाळ, बदाम, अक्रोड, मासे इत्यादीचा समावेश करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control Tips | diabetic person must follow 5 best rules for diabetes control

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Girls Health | पीरियड्स सुरू झाल्यानंतर थांबते मुलींच्या उंचीची वाढ! ‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे

 

Daibetes Signs In Eyes | डोळ्यात दिसणारी ‘ही’ लक्षणे डायबिटिजचे संकेत, तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?

 

Pune News | पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांची वर्षातून 3 वेळा तपासणी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News