पुण्यात मधुमेह आणि अस्थिरोग निवारण शिबीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि आई जगदंबा हेल्थ सेंटर यांच्या वतीने विनामूल्य मधुमेह आणि अस्थिरोग निवारण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

आई जगदंबा हेल्थ केअर सेंटरचे आदरणीय मेडिकल अॅस्ट्रॉलॉजर संजय कुलकर्णी काका यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिबीर होत असून सुप्रसिद्ध डॉक्टर मीनाक्षी पंडित सहभागी होणार आहेत.

हे शिबीर दि. १ ते १० फेब्रुवारी २०२० पर्यंत दगडूशेठ गणपती मंदिरामागील गणपती सदन येथे होईल. शिबीराची वेळ दुपारी २ ते रात्री ८.३० अशी राहील. शिबीरात सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी गणेश सदन कार्यालय, फोन ०२०- २४४९२००० येथे संपर्क साधून नोंदणी करावी. शिबीर प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर संपर्क साधावा.