निराधार महिलांना शिलाई मशीन देऊन भाऊबीज साजरी, स्वप्निल कुंजीरांचा ‘अनोखा’ उपक्रम

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – काही भगिनींच्या आयुष्याचे साथीदार दुर्दैवाने ऐन तरुणपणात त्यांना सोडून गेले अशावेळी त्यांच्या लहान मुलांचे संगोपन तसेच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली अशा भगिनींना सामाजिक बांधिलकी जपत आज “कै वसंतराव कुंजीर पाटिल ट्रस्ट”च्या वतीने “शिलाई मशीन” भेट देऊन भाऊबीज साजरी केली.

“दिवाळीचा सण” त्यातील भाऊबीज हा महत्वाचा दिवस. या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला मायेचा, प्रेमाचा, आधाराचा हात देण्याच वचन देतो, या भगिनींचा रक्ताचा भाऊ नसला तरी मायेचा प्रेमाचा, आधाराचा, पाठिराखा, बनून त्यांच्या सुख दुःखांत कै वसंतराव कुंजीर पाटील चँ.ट्रस्ट च्या माध्यमातून भक्कमपणे पाठकों उभा रहाणार असल्याचे ट्रस्ट चे अध्यक्ष श्री स्वप्नील कुंजीर पाटील यांनी सांगितले.

दुर्देवाने या भगिनींचे पती भरल्या संसाराचा डाव अर्ध्यावर मोडून गेले या सारखे दु:ख नाही. त्यानंतर संघर्ष करत आपला संसार पुढे चालवला या भगिनींनी मुलांची जबाबदारी, घरची जबाबदारी, सांभाळले हे अतिशय हिमतीचे काम कले. यामुळे त्यांच्या या आयुष्याच्या संघर्षात त्यांची थोडी मदत व्हावी यातून त्याना थोडा आधार मिळेल यासाठी, आजच्या भाऊबिजेला भाऊ म्हणून त्यांच्यासाठी उपयोग होइल अशी शिलाई मशीन देण्यात आली.

यावेळी ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष श्री स्वप्निल कुंजीर पाटील, मा उपसरपंच सुरेश कुंजीर पाटील, सचिव संतोष गुंजाळ, खजिनदार अभिराम काळभोर विश्वस्त पृथ्वीराज कुंजीर, सौ नुतन कुंजीर, श्रीमती. सुमन कुंजीर, सारिका कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, काळुराम कुंजीर, सतिश भिसे, आप्पा कुंजीर सह मान्यवर उपस्थीत होते.

स्वप्निल कुंजीर हे या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाज हिताची कामे करतात. गरीब निराधार पिडीत अशा लोकांच्या पाठीशी उभे राहून दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात.

Visit : Policenama.com