Digital Devices For Education | कशी शिकणार ‘न्यू इंडिया’ ! गुजरातसह ‘या’ 7 मोठ्या राज्यांमध्ये किमान 40% शाळकरी मुलांकडे डिजिटल डिव्हाईस नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Digital Devices For Education | केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Union Ministry of Education) तयार केलेल्या रिपोर्टनुसार, सात मोठी राज्य – आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 40 ते 70 टक्केच्या दरम्यान शाळेत जाणार्‍या मुलांकडे डिजिटल डिव्हाईस (Digital Devices For Education) नाही.

रिपोर्ट, 2020-21 मध्ये शालेय शिक्षण क्षेत्रातील उपक्रमातून समजते की, डिजिटल विभाजनामुळे काही राज्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे तर काहींनी स्मार्टफोन आणि टेलिव्हिजन सेटच्या योग्य उपलब्धतेमुळे त्याचा वापर केला आहे (70 per cent school children in 7 major states do not have digital devices for online Education).

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा रिपोर्ट
बुधवारी सार्वजनिक करण्यात आलेला हा रिपोर्ट 28 मेपासून 22 राज्य आणि 8 पैकी 7 आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे सामायिक करण्यात आलेल्या आकड्यांच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडु सरकारने विद्यार्थ्यांना 5.15 लाख लॅपटॉप वाटल्याचा (Digital Devices For Education) दावा केला आहे.

तर काही राज्यांमध्ये डिजिटल अ‍ॅक्सेसचा वापर करणार्‍या विद्यार्थ्यांचा खुप जास्त सहभाग आहे. मध्य प्रदेशात (70%), बिहार (58.09%), आंध्र प्रदेश (57%), आसाम (44.24%), झारखंड (43.42%) चा समावेश आहे. सोबतच उत्तराखंडमध्ये (41.17%) आणि गुजरातमध्ये 40 टक्के आहे.

या राज्यांमध्ये इतक्या मुलांकडे नाही डिव्हाईस
तर आसाम राज्यात 3,10,6255 विद्यार्थ्यांकडे डिजिटल डिव्हाईस नसल्याची माहिती आहे. युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एजुकेशन डेटानुसार, यामध्ये 65,907 शाळांमध्ये 7,01,5898 विद्यार्थी आहेत. ज्यानंतर आंध्र प्रदेश राज्याने मे 2021 मध्ये एकुण 81.36 लाख विद्यार्थ्यांपैकी 29.34 लाखाचे सर्वेक्षण केले आणि आढळले की, 2,01,568 विद्यार्थ्यांकडे सेलफोन नाही.

बिहारमध्ये 1.43 कोटी मुलांकडे मोबाइल नाही
10.22 लाख आई-वडिलांकडे असे फोन आहेत जे केवळ कॉल करू शकतात, आणि 4.57 लाख विद्यार्थ्यांकडे विना मोाबइल डेटावाले फोन आहेत. बिहारमध्ये 2.46 कोटी विद्यार्थी असलेल्या राज्यांनी सांगितले की, 1.43 कोटी मुलांकडे डिजिटल उपकरणे नाहीत.

गुजरातमध्येही बिकट आवस्था
तर गुजरातमध्ये 12,000 शाळांमध्ये युनिसेफच्या सर्वेक्षणात आढळले की, 40% विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नाही.
राज्यात 54,629 शाळांमध्ये 1.14 कोटी विद्यार्थी आहेत. झारखंडमध्ये 74.89 लाख विद्यार्थ्यांपैकी 32.52 लाख मुलांकडे डिजिटल अ‍ॅक्सेस नाही.
राज्याने केंद्राला कळवले की, 2018-19 मध्ये शाळा आणि क्लस्टर संसाधन केंद्राना टॅबलेट प्रदान केले होते.

एमपीमध्ये 70% मुलांकडे स्मार्टफोन नाही.
मध्य प्रदेशात राज्यातील 1.57 कोटी विद्यार्थ्यांपैकी 98 लाखांचा शिक्षण विभागाने सर्वे केला.
या सर्वेत आढळले की, त्यांच्यापैकी 70% मुलांकडे स्मार्टफोन नाही. एप्रिल 2021 च्या सर्वेक्षणात म्हटले आहे की,
53 लाख लोकांकडे टीव्ही आणि 57 लाख रेडियो सेट आहे.

उत्तराखंडमध्ये 2.14 लाख मुलांकडे स्मार्टफोन नाही
उत्तराखंडमध्ये राज्याच्या अधिकार्‍यांनी 23.39 लाख शाळकरी मुलांपैकी 5.20 लाखाचे सर्वेक्षण केले असता आढळले की,
2.14 लाख मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी डिजिटल उपकरणे नाहीत.
यापैकी 35,000पेक्षा जास्त शाळकरी मुलांना ई-पुस्तके वितरित करण्याचा प्रस्ताव आहे.

 

Web Title :- Digital Devices For Education | how many school students do not have access to digital devices in seven big states of the country revealed in the report of the ministry of education

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी! ‘या’ बँकेनं Home Loan वर व्याजदरात केली कपात, प्रोसेसिंग फी सुद्धा नाही; जाणून घ्या

3rd wave of covid in india | ऑनलाइन साजरा करा सण, 3 महिन्यांपर्यंत निष्काळजीपणा पडू शकतो महागात – केंद्राचा सल्ला

Sharad Pawar | ‘… म्हणून सत्ताधाऱ्यांनी आजची कारवाई केली, अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार’