महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती, पहा संपूर्ण यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या 23 राज्य लोक सेवेच्या अधिकाऱ्यांना आज थेट केंद्राच्या आयएएस पदावर बढती देण्यात आली आहे. केंद्र सरकारचे सचिव पंकज गंगवार यांनी आज या बढतीचे आदेश दिले.

आयएएस (बढती नियुक्ती) कायदा 1955 नुसार ही बढती करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य लोकसेवेचे अधिकारी बढतीवर आयएएस नियुक्त केले जातात. एखाद्या राज्यात आयएएस पदे रिक्त असतील तर त्याजागी या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यानुसार महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना आयएएस म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.