बैलगाड्यांची भव्य रॅली काढत डॉ. शिंदे करणार अपक्ष उमेदवारी दाखल

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेने कडून पाथरी विधानसभा मतदार संघात उमेवारी साठी अग्रभागी राहिलेले मात्र युतीत ही जागा मित्र पक्षाला गेल्याने मागिल अनेक वर्षा पासून मतदार संघातील गोरगरीबां साठी अहोरात्र समाज सेवा करणारा भुमीपूत्र डॉ जगदिश शिंदे हे आता जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागणार असून पाथरी विधानसभा मतदार संघातून ते चार सप्टेबर शुक्रवार रोजी भव्य अशा बैलगाडी रॅली व्दारे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा डॉ जगदिश शिंदे यांनी केली.

डॉ जगदिश शिंदे हे मागिल दहा वर्षा पासून पाथरी तालुक्यात आपल्या ओंकार हॉस्पिटलच्या माध्यमातून सामाजिक कार्यात जोडले गेले आहेत. मागिल पाच वर्षा  पासून निराधार वृद्धांना निशुल्क आधार देत त्यांचे पालन पोषण करत आज पर्यंत दोनशे वर वृद्धांची सेवा त्यांनी केली आहे. या सोबत मतदार संघ आणि बाहेरच्या रुग्नांना ही विविध आजारां साठी आरोग्य शिबिर घेत मोफत उपचार आणि शस्रक्रीया केल्या आहेत यात हजारो रुग्नांनी याचा फायदा घेतला आहे.

तर हजारो बेरोजगारांना रोजगार मेळाव्या मधून रोजगार मिळऊन देत त्यांच्या आणि कुटूंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. या सोबतच आत्महात्या ग्रस्त शेतकरी कुटूंबांना बियाणे मदत, पुरग्रस्तांना मदत शहिदांना मदत, विद्यार्थ्यां साठी करीअर मार्गदर्शन शिबिरे असे एकना अनेक उपक्रम राबत असतांना लोकसभा निवडणुकी वेळी परभणी येथील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेत प्रवेश करून पाथरी विधानसभा मतदार संघाची निवडणुक लढऊन राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचा निर्णय घेतला मात्र युतीत ही जागा विद्यमान आ मोहन फड यांना गेल्याने डॉ जगदिश शिंदे हे आता अभिनही तो कभी नही म्हणत विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार असून आपल्या साथीदारांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैलगाड्यांची रॅली काढून हा शेतकरी पुत्र असलेला समाजसेवक डॉक्टर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार लढणार आणि जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com