‘या’ गायकाच्या जेवणाचं बील झालं 5 हजार, टीपमध्ये महिला वेटरला दिले 1.44 लाख रूपये, तिला चक्करच आली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलिवूड गायक डोनी वॅलबर्ग काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. त्याने असे काही केले आहे जे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच, डोनीने एका वेट्रेसचे आयुष्य बदलून टाकले आहे.

हॉलिवूडचे प्रसिद्ध गायक डोनीने एका वेट्रेसला 2020 डॉलर म्हणजेच 1.44 लाख रूपयांची टिप दिली आहे. डोनीचे बिल त्यावेळी अवघे 78 डॉलर म्हणजे 5 हजार 600 रुपये एवढेच होते. सिंगरने बिलावर लिहिले, थँक्यू बेथनी, हॅपी न्यू इयर ! 2020 टिप चॅलेंज.

https://www.instagram.com/donniewahlberg/?utm_source=ig_embed

डोनीची पत्नी जेनी मॅकार्थीने आपल्या ट्विटरवर या बिलाचा फोटो शेअर केला आहे. आणि पाहता पाहता हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे डोनी IHOP स्टोअर नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. यावेळी डोनीने वेटर्सला सांगितले, आम्ही येथून निघेपर्यंत ही पावती उघडू नको. वेटर्स असलेल्या डेट्री फ्रॅन्झोनीने सांगितले की, ते गेल्यानंतर मी ती पावती पाहिली आणि बेशुद्ध होऊन पडले.

वेटर्स डेनिएल फ्रेंजोनी या टीपमुळे खूप खुश आहे. त्यांनी सांगितले की, त्या लहानपणापासून डोनीच्या गाण्यांच्या फॅन होत्या त्यामुळे त्यांना जेवण सर्व्ह केल्यामुळे खूप आनंदात होत्या. या पैशातून मी माझ्या कुटूंबाला मदत करेल असे वेटर्सने यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/