‘दर वाढले म्हणून बोंबलू नका, कांदा परवडत नसेल तर लसूण, मुळा खा’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन –   गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत असलेले कांद्याचे भाव आता परतीच्या पावसामुळं पिकांचं नुकसान झाल्यानंतर पुन्हा एकदा वाढले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 पर पोहोचले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळं आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजून कात्री लागणार आहे. या परिस्थितीत दर वाढले म्हणून बोंबलू नका जर कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा असा सल्ला राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू (Omprakash Babarao Kadu) यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी कांद्याचा भाव (Onion Rate) वाढण्यामागचं कारण सागितलं आहे. ते म्हणाले, “केद्र सरकारनं इराणमधू कांदा आयात केल्यानं कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र कांद्याचे भाव वाढल्यानं सर्वसामान्य माणसानं ओरडू नये. कांद्याचे भाव वाढले पाहिजे. कारण 70 वर्षांचा अनुशेष बाकी आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी मुळा, लसूण खावा” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला व नवीन पीक येण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळं देशात सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यानं बाजारभाव वाढत आहेत. मुंबई बाजार समितीत सोमवारी 705 टन कांद्याची आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये 40 ते 70 रुपयांनी त्याची विक्री होत होती.

किरकोळ मार्केटमध्येही कांद्याचे जर झपाट्यानं वाढत आहेत. मध्यम दर्जाचा कांदा 60 रुपये चांगल्या दर्जाचाा कांदा 80 रुपये किलो दरानं विकला जात आहे. सद्यस्थितीत मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगरमधू कांद्याची आवक होत आहे. उत्पादक जिल्ह्यांमध्येच दर वाढल्यानं मुंबईत प्रतिदिन भाव वाढत आहेत.