…तर मी ‘त्यांचा’ मुख्यप्रचारक म्हणून काम करेन : उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्याशिवाय दुसरा तुमची कोणी काळजी घेणारा असेल तर मी त्यांचा मुख्यप्रचारक म्हणून काम करतो, असे उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजपमध्ये आलो आहे. विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्याच सर्वच उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार आहे. मात्र, मागील निवडणुकीत मला तुम्ही पळवले तसे यावेळी करून नका, अशा शब्दात उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदारकीची पोटनिवडणूक विधानसभेच्या निवडणुकीसोबत घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले, माझ्यावर असलेल्या केसेसबाबत निवडणूक आयोगाने मला विचारले होते. यावर मी त्यांना सांगितले मला अन्याय सहन होत नाही. माझ्याशिवाय दुसरा कोणी तुमची काळजी घेणारा असेल तर मी त्याचा प्रचारप्रमुख म्हणून काम करेन, असे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.

1 ऑक्टोबरला अर्ज भरणार
पोटनिवडणुकीची तारीख निश्चित झाली असून उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी आपण आणि विधानसभेसाठी शिवेंद्रराजे 1 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्या विरोधात अद्याप विरोधकांनी कोणाला उमेदवारी देणार हे जाहीर केले नसून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत कदाचित नाव जाहीर करण्यात येईल.

Visit : Policenama.com