पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या शिवसेनेसमोर ‘या’ 4 ‘अटी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. काँग्रेसने शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी 4 आमदारांच्या पाठीमागे 1 मंत्रीपद तसेच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नको अशा काही अटी ठेवल्याची माहिती आहे.

शरद पवारांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. याविषयी वेणुगोपाळ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. या भेटीनंतरच महाशिवआघाडीच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार आहे. मात्र, काँग्रेसकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यावतीने समन्वय समिती तयार करावी, अशी काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या अटीनुसार एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनविण्यात यावा, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नको आणि 4 आमदारांच्या पाठीमागे 1 मंत्रीपद घ्यावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सत्तास्थापनेवरून काल दिवसभरात राज्यात अनेक आश्चर्यकारक राजकीय घडामोडी घडल्या. आजही महाराष्ट्रात सरकार स्थापनेवर मंथन सुरूच राहणार आहे. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल. अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरु होईल.

Visit : Policenama.com