औषधाचा दुरुपयोग म्हणजे नेमकं काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : औषधाचा दुरुपयोग म्हणजे शारीरिक आणि मानसिकरित्या औषधांवर अवलंबून राहणं. यामुळं व्यक्तीला वारंवार औषधं घ्यावीशी वाटतात. ही एक घातक समस्या आहे. जवळपास सर्व व्यसनाधीन औषधं मेंदूला अतिसंवेदनशील बनवून काही न्यूरोट्रान्समीटर तयार करतात. यामुळं सुखद असा हर्षातिरेक करतात आणि त्या व्यक्तीला वारंवार औषधं घ्यावीशी वाटतात.

काय आहेत याची लक्षणं ?
याची लक्षणं ही शारीरिक, वर्तमानात्मक आणि जैविक म्हणून वर्गीकृत केली जातात.

शारीरिक लक्षणं
– अति झोप येणं किंवा झोप न येणं
– डोळे लाल होणं
– विस्तृत किंवा संकुचित बुबुळ
– वजनात अचानक बदल होणं
– उलट्या
– भूक न लागणं

वर्तमानात्मक लक्षणं
– सामाजिक संघटन बदलणं
– निराशा
– आक्रमक वर्तन
– चिडचिड वाढणं
– एकटं राहण्याची प्रवृत्ती
– कुटुंब आणि सामाजिक संमेलन टाळणं

जैविक लक्षणं
– लिव्हर सोरायसिस
– हेपिटायटीस
– क्षयरोग
– तोंडाच्या समस्या

काय आहेत याची कारणं ?
नॅशनल इंस्टीट्युट ऑफ ड्रग अब्युजच्या म्हणण्यानुसार, दुरुपयोग करणाऱ्या औषधांमध्ये ॲनाबॉलिक स्टेरॉईड्स, ओव्ह द काऊंटर औषधं, हिरोईन, मेथाम्फेटामाईन आणि इतर बरीच औषधं सामील आहेत.

– औषधांचा दुरुपयोग प्रोत्साहित करणाऱ्या लोकांसोबत राहणं
– एखादा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य आधीपासूनच ड्रग्सचं व्यसन करत असणं
– लहान वयात दुरुपयोग करणारे पदार्थ घेणं
– एककीपणा आणि उदासनता
– पालकांच्या देखरेखीचा अभाव किंवा कठिण कौटुंबिक परिस्थिती

काय आहेत यावर उपचार ?
– अँटीडिप्रेसंट्स
– अँटीसायकोटीस
– अल्कोहोलसाठी अँटीडोट
– ओपोईड दुरुपयोगासाठी अँटीओपोईड्स