सतत पडत असलेल्या पावसाने मुग पिकाला फटका, सरकारकडून मदत मिळवून द्यावी

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन  –   जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सततच्या पडणाऱ्या पावसाने मुगाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. पाठी मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तोडणीला आलेल्य मुगाच्या पिकाला कोंब फुटत आहेत. मुगाच्या पिकाला नगदी पीक म्हणून पाहिले जाते. तालुक्‍यातील शेतकरी इतर पिकांसोबत मुगाच्या पिकालाही पेरणीसाठी प्राधान्य देतात. यंदा खरीपाची सुगी साधली असल्याचे दिसते. वाऱ्यावर डोलणाऱ्या पिकांवर पावसाचे सावट पडले आहे. पाठी मागील पाच ते सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुग शेतीला फटका बसला आहे. हाती नगदी येणारे पीक म्हणून मुगाला पाहिले जाते. यंदा मात्र मुग शेतीची माती होती काय असे वाटू लागले. तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे हाताला आलेल्या मुगाच्या सूगी ला फटका बसू लागला आहे. यामुळे मुग उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे चित्र पाथरी तालुक्यात पाहायला मिळत आहे.

झालेल्या नुकसानीपोटी पीक पाहणी करून प्रशासनाने सरकार कडून आर्थिक मदत तसेच विमा परतावा मिळवून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे लोणी बुद्रुकचे सरपंच श्याम धर्मे पाटील यांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मुगाच्या शेतातील उभ्या पिकाच्या शेंगा ला कोंब फुटुन बाहेर पडत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून द्यावी अशी मागणी निवेदनात श्याम धर्मे पाटील यांनी 20 ऑगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे तहसील कार्यालयाकडे केली.