लाच मागणाऱ्या ३ पोलिसांवर गुन्हा दाखल

कसारा : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक- मुंबई महामार्गावर गस्त घालत असताना वासिंद-सरमाळ फाट्यालगत जनावरांचे मांस घेवून जाणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी अडवले. पोलिसांनी टेम्पो सोडून देण्यासाठी तडजोडीस तयार असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांची माहिती टेम्पो मालक राहुल खोब्रागडे यांनी कोकण परिक्षेत्र आयुक्त नवल बजाज आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सांगितली.

कागदोपत्री सगळे योग्य असतानाही गाडी अडवल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणून टेम्पो मालकाच्या तक्रारीवरुन पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सापळा रचून ४० हजार रुपयांची देवाणघेवाण करताना दोन खासगी व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

शनिवारी (दि.१३) संध्याकाळी गस्त पथकातील उपनिरीक्षक शेंडे, पोलीस कर्मचारी शेटे आणि इंगोळे यांनी मास घेऊन जाणारा टेम्पो पकडला. टेम्पोचालक शेख मेहमूद बेसुमार याने याची माहिती मालक राहुल खोब्रागडे यांना दिली. खोब्रागडे यांनी पोलीस उपनिरीक्षक शेंडे यांना सदर प्रकार मिटवा असे सांगितले. मात्र, अवैध गोमांस आहे, त्यामुळे कारवाई होणार. तुम्ही टेम्पो पोलीस ठाण्यात घ्या असे चालक बेसुमार याला सांगितले.

दरम्यान सोबत असलेले पोलीस कॉन्स्टेबल शेटे आणि पोलीस शिपाई इंगोले यांच्यासह अरुण व राऊत या दोन खासगी व्यक्तींनी टेम्पो चालकास तडजोडीस तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर सापाळा रचून पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणचे डॉ. शिवाजीराव राठोड, उपअधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गोडबोले हे करीत आहेत.

You might also like