‘लॉकडाऊन’ दरम्यान ‘दूध’ आणण्यासाठी बाहेर गेला, पोलिसांच्या ‘दंडुकेशाही’मुळे जीव ‘गमावला’

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरताच नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचे मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या या वागणुकीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला बेदम मारहाण केल्यामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घरात राहणे बंधनकारक आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी असते. पश्चिम बंगालमधील हावडा येथील 32 वर्षीय युवक दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, पोलिसांच्या तावडित सापडला. पोलिसांनी युवकाला बेदम मारहाण केली. यामध्ये हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. लाल स्वामी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

स्वामी याच्या पत्नीने आरोप केला आहे की, लाल स्वामी हे दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले. रस्त्यावर जमलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जमध्ये स्वामी यांना बेदम मारहाण झाली. त्यानंतर लाल स्वामी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी स्वामी यांना तपासून मृत घोषीत केले.
लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना गर्दी करून न देणे हे पोलिसांचे काम आहे. पण आपल्या लाठीने एखाद्याचा जीव जाईपर्यंत त्याला बेदम मारहाण करणं आणि लोकांना नाहक त्रास देणं हे योग्य नाही. आम्हाला आवश्यक वस्तूंसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे की नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like