सांगलीत आजपासून टॉमबाईज प्रदर्शनदसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांगलीकरांसाठी खास आयोजन

सांगली : पोलिसनामा ऑनलाइन – दसरा, आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सांगलीकरांसाठी टॉमबाईज या खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील आमराई ऑफिसर्स क्लब येथे शनिवारी आणि रविवारी हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचा सांगलीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिमरत सुहेल शर्मा यांनी केले आहे.

या प्रदर्शनासाठी सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे. सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. खास दसरा, दिवाळीसाठी विविध प्रकारच्या साड्या, फुलकारी, लखनवी, शॉल यासह अन्य वस्तू प्रदर्शनात उपलब्ध आहेत. प्रत्येक व्हरायटीच्या ठराविक वस्तू उपलब्ध असल्याने सांगलीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे.

Visit : Policenama.com