पालघर जिल्ह्यात 2 दिवसांपासून भूकंपाचे 13 धक्के

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन दिवसांत भूकंपाचे 13 धक्के बसल्याने पालघर जिल्हा हादरला. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाचे चार धक्के बसले. हे भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी वारंवार भूकंप होत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

डहाणू आणि तलासरीत भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची रिश्टर स्केल 2.8 एवढी तीव्रता नोंदवली गेली. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल सोमवारी पहाटे 4 वाजता भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्याची रिश्टर स्केलवर 2.0 एवढी तीव्रता नोंदवली गेली. त्यानंतर अवघ्या सव्वा तासातच म्हणजे 5 वाजून 18 मिनिटांनी 2.3 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. 8 वाजून 45 मिनिटांनी 2.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर अवघ्या 2 मिनिटातच पुन्हा दुसरा धक्का जाणवला. 8 वाजून 47 मिनिटांनी हा धक्का जाणवला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 2 एवढी नोंदवली गेली.

कालपासून भूकंपाची मालिका सुरुच होती. आज मध्यरात्री 1 वाजून 24 मिनिटांनी भूंकपाचा पहिला धक्का जाणवला. त्यांची तीव्रता 2.8 एवढी होती. त्यानंतर पहाटे 5 वाजून 47 मिनिटांनी 2.7, सकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी 2.0 आणि सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी 1.9 एवढ्या तीव्रतेचे धक्के जाणवले. एका मागून एक असे सलग दोन दिवस भूकंपाचे धक्केच जाणवत होते. त्यामुळे अनेकांचा डोळा देखील लागला नाही. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे पालघरवासियांच्या मनात भीतीचे सावट आहे.