नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 4.0 नोंदली गेली तीव्रता

नाशिक : राज्यातील नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.0 नोंदली गेली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 11.41 वाजता भूकंपाचा धक्का बसला. अजूनपर्यंत जिवित किंवा वित्तहानीबाबत कोणतेही वृत्त नाही. भूकंपाची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे.

यापूर्वी मागील महिन्यात महाराष्ट्रातील पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. पालघरमध्ये सौम्य धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते. पालघर जिल्ह्यात 2.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात कोणतीही जिवित किंवा वित्तहानी झाली नव्हती.

मागील महिन्याच्या 26 तारीखेला पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी भूकंप जाणवला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.1 होती.