‘अजित पवारांसोबत 5 वाजता शपथ घेता आणि…,’ एकनाथ खडसेंनी मारला टोला

पोलीसनामा ऑनलाईन टीम –    मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असणाऱ्या एकनाथ खडसेंनी ( Eknath Khadse) अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता खडसे हे शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये( NCP) प्रवेश करणार आहेत.त्यानंतर आता एका वृत्तवाहिनीशी एकनाथ खडसे यांनी अजित पवार ( Ajit Pawar) यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे अशी विचारणा केली.त्याचबरोबर विधानसभेनंतर शिवसेनेसोबत ( Shivsena) युती केली असतं तर सरकारमध्ये आलो असतो. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यापेक्षा शिवसेनेसोबत युती केली असती तर कदाचित दोघं राज्यात आले असते. असेदेखील यावेळी खडसे यांनी म्हटले.या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यावर देखील आरोप केले. देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहे, तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला. मी पक्षाला दोष दिला नाही, नेतृत्वाला दिला.

एकाही नेत्याने भाजपा सोडणार कळाल्यावर फोन केला नाही. चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी फोन केला. मी अमित शाह, पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. त्याचबरोबर भाजपमधील संस्कृतीवर बोलताना ते म्हणाले की, भाजपमध्ये आधी सर्वांशी बोलून निर्णय व्हायचे.पण आता भाजपमध्ये एका व्यक्तीने निर्णय घ्यायचा आणि सर्वांनी मान्य करायचा,” असं एकनाथ खडसेंनी सांगितलं. खडसेंनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या टीकेला उत्तर देताना कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, असं म्हटलं आहे. यावर खडसेंनी “मी फडणवीसांना व्हिलन ठरवलं नाही असं स्पष्ट केलं.

“आयुष्यभर ज्यांनी चारित्र्य जपलं, त्यांच्यावर तुम्ही असे आरोप करता, अशी खंत देखील त्यांनी यावेळी मुलाखतीमध्ये व्यक्त केली. दरम्यान, भाजपमध्ये ( BJP) अनेक लोकं नाराज असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.चंद्रकांत पाटीलही आता स्वत: निर्णय घेऊ शकत नाही, त्यांनाही फडणवीसांना विचारुन निर्णय घ्यावे लागतात,” असेदेखील त्यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर “शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिघांकडून मला ऑफर होत्या, पण राष्ट्रवादीत या ठिकाणी विस्ताराला वाव आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.