एकता कपूरनं ‘क्वारंटाईन’मध्ये केलं चक्क ‘ते’ काम ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या लॉकडाऊनमुळं सारेच सेलिब्रिटी घरातच आहेत. ही कलाकार मंडळी अशी काही काम करताना दिसत आहेत जी करताना ते याआधी कधीही दिसले नाहीत. काही झाडू मारताना दिसत आहेत तर काही भांडी धुताना. काहींचे व्हिडीओदेखील सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. सध्य क्वारंटाईनमध्ये असलेली टीव्ही आणि फिल्मची प्रोड्युसर एकता कपूर हिनंही असंच काहीसं केलं आहे ज्याची तुम्ही कल्पना करू शकणार नाहीत.

एकता कपूर जोतिष आणि न्यूमरोलॉजीवर विश्वास ठेवते. ती नेहमीच हातात अनेक अंगठ्या घालून ठेवताना दिसते. तिला बिना अंगठ्याचं पाहिलेलं तुम्हाला क्वचितच आठवत असावं. परंतु एकतानं आता सर्व अंगठ्या काढल्या असून हात पूर्ण रिकामा केला आहे. याचा पुरावा आहे तिचा नवीन व्हिडीओ. जो तिनं इंस्टावरून शेअर केला आहे.

एकतानं एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे यात ती रिंग फ्री दिसत आहे. या व्हिडीओत ती आपल्या हातांची बोटंही फ्लाँट करताना दिसत आहे. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, तिच्या पाचही बोटांमध्ये रिंग नाहीये. अंगठ्यांनी भरलेले तिचे हात चक्क रिकामे आहेत.

चाहत्यांसोबत अनेक सेलेब्सदेखील हे सारं पाहून चिकत झाले आहेत. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडीओ शेअर करत एकता म्हणते, “अशातच दुसऱ्या बातम्यांमध्ये, थानोसनं ब्लिडींग सोडली आहे. त्यानं दुनियेला नष्ट केलं आहे. मजाक करत आहे.”