लवकरच ‘महाविकास’ आघाडीचं सरकार, खा. सुळेंनंतर रोहित पवारांची अजित पवारांना ‘भावनिक’ साद, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्तेसाठी कुटुंबात फाटाफूट नको, तू काहीही कर, पण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दे, अशी भावनीक साद राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांना घातली होती. त्यानंतर आता अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्वगृही परतण्याचे भावनिक आव्हान केले आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टवर लिहले आहे की, ‘लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.

आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं.’

पक्षात व कुटुंबात फूट –
भाजपशी हातमिळवणी करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. तसेच हा राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाला मोठा धक्का मानला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचा हा निर्णय वैयक्तीक असून या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही, असे ट्विट केले होते तर सुप्रिया सुळे यांनी party and Family Split असं व्हाट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवलं होत. तर रोहित पवार यांनी ऑफिशिअल फेसबुक पेजवरील प्रोफाइल फोटो बदलून त्याठिकाणी शरद पवारांचा फोटो ठेवून शरद पवारांच्या बाजूने असल्याचे दर्शवलं होत.

Visit : Policenama.com