EPFO कर्मचार्‍यांची मागणी, ‘इतकी’ वाढवावी महिन्याची पेन्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कार्यक्षेत्रात येणाऱ्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना किमान 7,500 रुपये मासिक निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी पेन्शन संघर्ष समितीने रामलीला मैदानावर मोर्चा काढला. हजारो पेन्शनरांनी यात भाग घेतला. निवृत्तीवेतनधारक महागाई भत्त्यासह मासिक 7500 रुपये निवृत्तीवेतन, पेन्शनधारकाच्या जोडीदारास मोफत आरोग्य सुविधा आणि ईपीएस 95 च्या अंतर्गत नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना 5000 रुपये मासिक निवृत्तीवेतनाची मागणी करीत आहेत.

निवृत्तीवेतनधारकांचे म्हणणे आहे की 30-30 वर्षे काम करूनही आणि सतत ईपीएस आधारित पेन्शनला हातभार लावूनही कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन म्हणून जास्तीत जास्त 500 ते 2,500 रुपये मिळतात. यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना खर्च भागवणे अवघड जाते.

ईपीएस 95 अंतर्गत कर्मचार्‍यांच्या मूलभूत पगाराच्या 12 टक्के हिस्सा भविष्य निर्वाह निधीमध्ये जातो. त्याच वेळी, 12 टक्क्यांपैकी 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेला जातो. या व्यतिरिक्त पेन्शन फंडामध्येही सरकारचे 1.16 टक्के योगदान आहे.

Visit : Policenama.com