‘माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदार नव्हता’ ; माजी मंत्री राम शिंदेंची विखे – पाटलांवर टीका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री राम शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे. जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले आहे. सर्व पदे मी उपभोगली आहेत. पक्षाचेही योगदान आहे. त्यामुळे मला विखे कुटुंबीयांनी चॅलेंज करू नये.

भाजप उमेदवारांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण सांगा, असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. यावर राम शिंदे म्हणाले की, माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. आम्ही स्वकर्तुत्वाने पुढे आलो आहोत. जनतेने आम्हाला निवडून दिले. पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तक्रार केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील. कोणी कोणाच्या पराभवासाठी प्रयत्न केले किंवा कोण जबाबदार आहे, हे उघड होईल.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like