एक ‘पॉर्न’स्टार ज्यावेळी बनतो क्रिकेटचा ‘अंपायर’ अन्…

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये 5 नोव्हेंबरमध्ये खेळविण्यात आलेल्या टी-20 सामन्यात खेळाडूंपेक्षा जास्त चर्चा होती ती अम्पायरची. गार्थ स्टीराट(वय-51) यांनी अम्पायर म्हणून काम पाहिलं. यापूर्वी ते पॉर्न इंडस्ट्रीत काम करत होते. गार्थ स्टीराट यांनी पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत क्रिकेट विश्वात करिअरला सुरुवात केली आहे. स्टीराट याआधी न्यूझीलंडच्या गोल्फर्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. मात्र 10वर्षांपूर्वी जेव्हा स्टीराट हे पार्न विश्वात काम करत असल्याचे रहस्य उघडकीस आले होते तेव्हा त्यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. याबाबतची माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे.

गोल्फर्स संघाच्या पदावरून हटवण्यात आल्यानंतर स्टीराट यांनी क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केलं आणि पंच होण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले. स्टीराट यांनी याबाबत इंग्लंडच्या खेळाडूंनाही माहिती दिली होती. याआधी स्टीराट यांनी महिला क्रिकेट विश्वात अनेक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिलं आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 14 धावांनी पराभव केला.

Visit : Policenama.com