3 मे नंतर ‘लॉकडाऊन’बाबत केंद्र सरकार ‘ही’ भूमिका घेण्याच्या तयारीत, तयार केला ‘एक्झीट प्लॅन’ ! ,जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला आहे. सोमवारी काही विशिष्ट अटींसह लॉकडाउनही शिथिल केले जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनूसार केंद्र सरकार 3 मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याच्या मूडमध्ये नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरची योजनाही तयार केली गेली आहे. माहितीनुसार, 3 मे नंतर लॉकडाऊन हळूहळू काढून टाकले जाईल आणि काही अटींसह सवलत दिली जाईल. दरम्यान, रेड आणि ऑरेंज झोन असलेल्या भागांना सध्या ही सूट मिळणार नाही. कोरोना प्रकरणे कमी झाल्यास सूट देण्याची व्याप्ती वाढविण्यात येईल.

लॉकडाउनचा एक्झिट प्लॅन :
– 3 मेनंतरही रेल्वे, विमान प्रवास सुरु होणे अवघड आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

– ग्रीन झोन असलेल्या भागात केवळ शहरातीलच रहदारीस परवानगी देण्यात येईल.

– सामाजिक अंतर आणि मास्क लोकांच्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग असतील. याला बऱ्याच काळापर्यंत अनिवार्य केले जाऊ शकते.

– आपणास घराबाहेर पाडण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते परंतु मास्क घालावे लागेल आणि एकमेकांपासून अंतर राखण्याची काळजी घ्यावी लागेल.

– सामाजिक अंतर लक्षात घेऊन कार्यालयात काम करण्याची परवानगी मिळू शकते.

– कुठल्याही ठिकाणी गर्दी जमवण्यासाठी पूर्ण बंदी असेल.

– विवाह सोहळे, धार्मिक स्थळे यासारख्या ठिकाणी सध्या दिलासा दिला जाऊ शकत नाही. लग्नासाठी जास्तीत जास्त किती अतिथीं येऊ शकतात, यासाठी आपल्याला डीएमची लेखी परवानगी घ्यावी लागेल.

– 3 मे नंतर सार्वजनिक उपयोगिता दुकानांना काही अटींसह आराम दिला जाऊ शकतो.

– लॉकडाऊन संपल्यानंतरही मुंबई, दिल्ली, नोएडा, इंदूर यासारख्या भागात विशेष देखरेख ठेवली जाईल. येथे लॉकडाऊनच्या काही नियमांचे पालन केले जाईल.

– माहितीनुसार 15 मेनंतरच देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा अधिक आढावा घेतल्यानंतर पुढील रणनीती ठरविली जाईल.