Facial Yoga Benefits | त्वचेला चमकदार, तरुण बनवण्यासाठी घरीच करा फेशियल योगा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Facial Yoga Benefits | आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. योग शारीरिक आरोग्यासाठी वरदान आहे, तर योग आपल्या शरीरास अनेक आजारापासून मुक्त ठेवतो. योगाच्या अनेक क्रिया आहेत त्यांचे वेगवेगळे शारीरिक फायदे आहेत, परंतु महिलांसाठी खास योगा आहोत त्यांचे नाव ‘फेशियल योगा’ (Facial Yoga Benefits)

चेहऱ्यावरील योगाद्वारे आपण आपल्या त्वचेला नवीन चमक देऊन त्वचा तंदुरुस्त ठेवू शकता, कारण चेहऱ्याचा योग केल्याने त्वचेच्या पेशींमध्ये रक्तप्रवाह वाढतो. आपल्या त्वचेच्या पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो. ज्यामुळे त्वचेची चमक वाढते. चला तर मग ‘फेशियल योगा’ कसा करायचा ते जाणून घेऊया.

असा करा ‘फेशियल योगा’

1) स्नायूंना वॉर्म-अप करा –
चेहऱ्याचा योग करण्यापूर्वी, आपण आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना वॉर्म-अप केले पाहिजे. जेणेकरून अचानक स्ट्रेसमुळे कोणत्याही स्नायूमध्ये ताण येणार नाही. वॉर्म-अप करण्यासाठी, आपले तोंड जितके शक्य तितके उघडा आणि आपली जीभ बाहेर काढा.

2) डोळ्याच्या हालचाली करा –
यानंतर डोळ्याच्या हालचाली करा. शक्य तितके डोळे मोठे करा. ही स्थिती ठेवून, आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या उजवीकडे आणि डावीकडे वळवा. कमीतकमी २ मिनिटे या स्थितीत राहिल्यानंतर चेहऱ्याला आराम द्या आणि त्यानंतर त्याच पद्धतीने सराव करा. आपण हे ३ वेळा करा.

3) गालांच्या स्नायूंसाठी हे व्यायाम करा –
गालांच्या स्नायूंचा व्यायाम करण्यासाठी, बोटाच्या सहाय्याने गालांवर हलके मालिश करा. मालिश करताना, दोन्ही गाल पूर्णपणे मालिश करा. आता तोंडातून हवा काढून गाल सामान्य स्थितीत आणा आणि हलक्या हातांनी पुन्हा मालिश करा. असे केल्याने स्नायू रिलँक्स होतील आणि लवचिकता वाढेल. याशिवाय हे त्वचेला घट्ट व सुरकुत्या मुक्त ठेवण्यास मदत करते.

4) चेहऱ्याच्या त्वचेला घट्ट करण्यासाठी काय करा –
जेव्हा चेहऱ्यावर चरबी जमा होते किंवा त्वचा सैल होते, यासाठी, आपल्या बोटांना तोंडाच्या दोन्ही बाजूस ठेवा आणि नंतर बोटांना गोलाकार हालचाली (घड्याळाच्या दिशेने) हलवा.
या दरम्यान दात बंद ठेवावे. एकदा घड्याळाच्या दिशेने आणि एकदा घड्याळाच्या विरूद्ध दिशेने बोट हलविल्यानंतर स्नायूंना रिलँक्स होऊ द्या.
काही सेकंदांनंतर याची पुन्हा पुनरावृत्ती करा.

5) आहाराकडेही लक्ष द्या –
व्यायामाशिवाय, संतुलित आहार आपल्या त्वचेला चमक देते.
यासाठी आपण पुरेसे पाणी प्यावे, दुध, दही, कोशिंबीर, फळे, हिरव्या भाज्या खावे.
उन्हात फिरणे टाळा आणि सनग्लासेस घाला.

Web Title :- facial yoga benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 रुपयांऐवजी येतील 4000 रुपये! सरकार वाढवणार आहे योजनेची रक्कम?

Weight Loss Tips | जर तुम्ही अशा पद्धतीने शिजवलेला भात खाल्ला तर तुमचे वजन कधीही वाढणार नाही; जाणून घ्या

Pune Crime | कुंजीरवाडीच्या सरपंच अंजु गायकवाड यांना ‘मोक्का’ न्यायालयाकडून जामीन मंजूर