सांगलीतील बनावट नोटांप्रकरणी एटीएसची मदत घेणार: विश्‍वास नांगरे-पाटील

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन

सांगली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक केली होती . आता त्यातील सूत्रधारांसहित पाच जणांना अटक केली आहे. या टोळीची पाळेमुळे पश्‍चिम बंगालपर्यंत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा खोलवर जाऊन तापास केला जाईल तसेच या प्रकरणात एटीएसची मदत घेण्यात येईल अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे.

[amazon_link asins=’B0778JFC13,B0748NPV86′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7e10268-b0eb-11e8-9b17-fba633443687′]

यावेळी बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की , सांगली शहर पोलिसांनी बनावट नोटा खपवणार्‍या एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्यातील सुत्रधारासह पाचजणांना अटक केली आहे. याची पाळेमुळे पश्‍चिम बंगालपर्यंत सल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यासाठी सांगली पोलिसांचे एक पथक लवकरच तपासासाठी पश्‍चिम बंगालला पाठवण्यात येणार आहे. त्याशिवाय या प्रकरणाची व्याप्ती पाहता यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
शिवाय यामध्ये देशविघातक शक्ती कार्यरत असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकासह या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचीही मदत घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणाचा गतीने तपास करून सूत्रधाराला अटक करण्यात येईल असेही नांगरे पाटील यांनी यावेळी सांगितले.