PAK च्या विमान अपघातात मॉडेल झाराचा मृत्यू , शेवटच्या Insta पोस्टमध्ये लिहिलं होतं – ‘Fly high its good’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पाकिस्तानात कराची विमानतळाच्या दिशेनं निघालेल्या विमानाचा लँडिंगआधीच निवासी भागात कोसळून भीषण अपघात झाला आहे. यानंतर लगेचच विनमानं पेट घेतला. यातील मृतांचा किंवा वाचलेल्यांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. असं सांगितलं जात आहे की, यात 100 प्रवासी होते. या अपघातात पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा आबिद हिचा मृत्यू झाला आहे. झाराची जी शेवटची इंस्टा पोस्ट आहे ती खूप प्रेरणा देणारी होती. परंतु तीच पोस्ट आता इमोशनल करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CAXk8iPlB2B/

झारानं तिच्या इंस्टावर एक हेलिकॉप्टरमध्ये बसलेला फोटो शेअर केला होता. यात तिनं म्हटलं होतं की, Fly high its good.” हीच इंस्टा पोस्ट झाराची शेवटची पोस्ट ठरली. सध्या तिच्या या पोस्टची सोशलवर चर्चा होताना दिसत आहे. झारा पारंपरिक पोषाखातील मॉडेलिंगासाठी फेमस होती.

https://www.instagram.com/p/B-NFhtIFYnl/

अशी माहिती आहे की, लाहोरकडून कराचीकडे जाणाऱ्या या विमानात झारा आबिदही होती. काकांच निधन झाल्यानं झारा लाहोरवरून निघाली होती. कराची विमानतळाच्या जवळच निवासी भागात हे विमान कोसळलं आहे.

https://www.instagram.com/p/B8jRT3tlj2E/

फॅशन डिझायनर खादीजाह शाहनं ट्विट करत म्हटलं आहे की, फॅशन इंडस्ट्रीनं विमान अपघातात झारा आबिदला गमावलं आहे. ती खूप कष्टाळू होती. तिच्या आत्मयाला शांती लाभो. यानंतर अनेक युजर्सनीही तिला सोशलवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

https://www.instagram.com/p/B4H501JFrl-/

https://www.instagram.com/p/B3ZeOoalwY6/

https://www.instagram.com/p/B3FHNArBcMm/

https://www.instagram.com/p/B26VfqolCP7/

https://www.instagram.com/p/B1WfoN8hgYp/