‘जेवढी काँग्रेस मागे जाईल, तेवढाच देश पुढे येईल’, ‘दंगल गर्ल’ बबिता फोगाटची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   काँग्रेस पक्षावर टीका करण्यात भाजपचे नेते मागे पडत नाही. जागतिक चॅम्पीयन कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. बबिताने काँग्रेसवर टीका करताना म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाची जेवढी जास्त पिछेहाट होईल, तितकाच आपल्या देशाचा विकास होईल. ‘दंगल गर्ल’ बबिताने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे ट्विट करत काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

या टीकेमुळे पुन्हा ‘दंगल गर्ल’ बबिता फोगाट सोशल मीडियातून चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशातील विविध घटनांबद्दल ती आपले मत व्यक्त करत असते.

सध्या, बॉलिवूडमधील नेपोटीजमवर बोलणार्‍या कंगना रनौतचे देखील कौतुक बबिता फोगाटने केले होते. ‘शेरनी सब पर भारी पड़ती दिखाई दे रही है’, असे हिंदीमध्ये म्हणत म्हटल होते. यावेळी अभिनेत्री कंगना रनौतने मुलाखतीतून बॉलिवूडमधील खळबळजनक खुलासे केले होते, याचे खूप कौतुक बबिताने केले होते.

तर, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतरही बबिताने त्यांच्या भाषणाचे कौतुक केले होते. पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांची विशेष आर्थिक योजना घोषीत केली आहे. मोदी यांची ही घोषणा म्हणजे अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार, अशी प्रतिक्रिया ‘दंगल गर्ल’ बिबता फोगाटने दिली होती.

सध्या राजस्थानमधील काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि तेथील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये शाब्दीक चकमक सुरु आहे. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्याकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. तर, भाजपा नेतेही राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. त्यातच, बबिता फोगाटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेस पक्षावर टीका केली. यात तिने ट्विट करत म्हटले आहे की, ‘कांग्रेस जितनी पीछे जाएगी। देश उतना ही आगे जाएगा ॥; बबिताच्या या ट्विटवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

‘दंगल गर्ल’ बबिता फोगाटने देखील आता राजकारणाकडे अधिक लक्ष देऊन आपल्या प्रतिक्रियाव्दारे लोकांचे लक्ष वेधले आहे. भाजप नेत्याच्या कन्या असलेल्या बबिताने आता राजकारणाकडे वाटचाल करण्याकडे लक्ष दिले आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.