हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेससारखं दिसण्यासाठी ‘या’ मुलीनं केल्या 50 सर्जरी, कोरोना झाल्यानं जेलमधून ICU मध्ये दाखल !

पोलिसनामा ऑनलाइन –हॉलिवूड स्टार अँजेलिना जोली सारखं दिसण्यासाठी अनेक सर्जरी करणारी इराणची इंस्टाग्राम स्टार सहर तबर हिला जेलमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिला तेहरानच्या एका रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. एखाद्या झोंबी सारखी दिसणारी ही महिला इंस्टावर खूप फेमस होती. परंतु गेल्या वर्षी इशिनंदा आणि हिंसाचाराप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती.

एका इंग्रजी वृत्तानुसार, इंस्टा स्टार सहर तबर 22 वर्षांची आहे. तिचं खरं नाव आहे फतेमिह खिशवंद. ती इराणच राजधानी तेहरानची रहिवासी आहे. तिनं अनेकदा आपल्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे. सोशल मीडियावर आपल्या चेहऱ्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर सहर खूप प्रसिद्ध झाली होती.

कोरोनाची महामारी पाहता सहर तबरच्या वकिलांनी तिला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यांना काही यश आलंच नाही. वकिलांच्या मते, इराणमध्ये अमेरिकन सेंटर्स फॉर ह्युमन राईट्सनं म्हटलं आहे की, देशातील एका न्यायाधीशानं सहर तबरला जामीन देण्यास नकार दिला आहे. देशातील जेलमध्ये आता कोरोना पसरताना दिसत आहे.

मानव अधिकार वकिल पायेम डेराफशन यांनी बुधवारी सांगितलं की, आम्हाला समजलं की, सहर तबरला कोरोनाची लागण झाली आहे. तिच्या कोठडीचा आदेस यावेळी वाढवण्यात आला आहे.